निवडणूक कर्मचाऱ्याचा उष्माघाताने बुथवरच मृत्यू

निवडणूक कर्मचाऱ्याचा उष्माघाताने बुथवरच मृत्यू

उल्हासनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमान 40 डिग्री च्या पुढे पोहचले आहे. याचाच फटका उल्हासनगरात आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याला बसला असून अति उष्माघाताने या कर्मचाऱ्याचा बुथवरच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

भगवान मगरे (वय 54) असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी होती. रविवारी सकाळी म्हारळ गाव रिजेन्सी निर्माण येथील खुल्या मैदानातून ईव्हीएमचे वाटप करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेत आरोग्य विभागात सफाई कामगार पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे यांची उल्हासनगर विधानसभेच्या मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बूथ क्रमांक 87 येथे सेवा लागली होती. भगवान मगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ईव्हीएम आणि साहित्य घेऊन दुपारी 12 वाजताच्या सुमारास मीनल अर्जुन चौहान विद्यालयातील बूथ गाठला. बूथ प्रमुखांच्या आदेशाने मतदान केंद्रावर साहित्य लावून झाल्यावर भगवान मगरे यांनी जेवण केले. त्यानंतर खुर्चीवर बसलेले मगरे हे अचानक खाली कोसळले. त्यांना बूथ प्रमुखांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉ. विश्वनाथ पेंडकर या विषयी विचारले असते शवविच्छेदन अहवालानंतरच मगरे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. मात्र रविवारी उल्हासनगर मधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहचल्याने मगरे याना उष्माघाताचा त्रास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मगरे यांच्या मुलीला त्यांच्या मेडिकल इतिहासाबाबत विचारले असता त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता, असे तिने सांगितले.

या घटनेची माहिती उल्हासनगर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे याना मिळताच त्यांनी मध्यवर्ती रुग्णालय गाठून मयताच्या नातेवाईकांची विचारपूस केली. निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत मध्यवर्ती पोलिस ठाण्यात जबाब दिला. त्यानंतर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया मध्यवर्ती रुग्णालयात सायंकाळी उशिरा होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com