ठाण्यातील निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

ठाण्यातील निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज
ठाण्यातील निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांची मतमोजणी गुरुवारी (ता.२४) होत असून, त्या-त्या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्‍चित केलेल्या १८ मतमोजणी केंद्रांवर ती होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास बाराशे कर्मचारी व अधिकारी नेमण्यात आले असून, त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला. 

गुरुवारी सकाळी ८ वाजता मोजणीस सुरुवात होईल. प्रत्येक विधासनभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मोजणी होणार आहे. सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्‍ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे असल्याचे निर्देश निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. 

मतमोजणी केंद्र पुढीलप्रमाणे 
१३४ - भिवंडी (ग्रामीण) - फरहान खान हॉल, मिल्लतनगर २ ममता हॉस्पिटल जवळ, भिवंडी 
१३५ - शहापूर - प्रियदर्शनी हॉल, फॉरेस्ट ट्रेनिंग इन्स्टीटयुट, शहापूर 
१३६ - भिवंडी (पश्‍चिम) - हाळदेवी माता मंगल भवन, तळमजला हॉल, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, कामतघर भिवंडी 
१३७ - भिवंडी (पूर्व) - लाटे संपदा नाईक मंगल कार्यालय जवळ, छत्रपती शिवाजी स्टैडियम, भादवडगाव 
१३८ - कल्याण (पश्‍चिम) - मुंबई युनिव्हर्ससीटी सब सेंटर खडकपाडा, कल्याण (प.) 
१३९ - मुरबाड - ऑक्‍सन हॉल एपीएमसी मार्केट मुरबाड ता.मुरबाड 
१४० - अंबरनाथ - महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ-कल्याण बदलापूर रोड, अंबरनाथ (प.) 
१४१ - उल्हासनगर - उपविभागीय कार्यालय, पवई चौक उल्हासनगर - ३
१४२ - कल्याण (पूर्व) - बॅडमिंटन हॉल, उल्हासनगर महानगरपालिका वार्ड नं. ३ जवळ व्हीटीसी मैदान उल्हासनगर 
१४३ - डोंबिवली - सावित्रीबाई फुले कलामंदिर तळमजला, घरडा सर्कल जवळ, एमआयडीसी डोंबिवली (पु.) 
१४४ - कल्याण (ग्रामीण) - लाटे सुरेंद्र वाजपेयी इंदौर हॉल, सावळाराम महाराज मैदान, घरडा सर्कल, डोंबिवली (पु.) 
१४५ - मिरा-भाईंदर - रॉयल कॉलेज तळमजला, रॉयल हायर एज्युकेशन सोसायटी बिल्डींग, भक्ती वेदांन्त हॉस्पिटल जवळ, मिरारोड (पू.) 
१४६ - ओवळा - माजिवडा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, पोखरण रोड नं. २, ठाणे (प.) बेथानी हॉस्पिटल बाजूला, ठाणे (प.) 
१४७ - कोपरी-पाचपाखाडी - आयटीआय, वागळे इस्टेट वर्कशॉप नं.1,रोड नं. २८, रामनगर, वागळे इस्टेट ठाणे (प.) 
१४८ - ठाणे - न्यू होरीजन स्कूल, हिरानंदानी इस्टेट, बाजूला, रोदास इनक्‍लेव, कोलशेत, घोडबंदर रोड, ठाणे 
१४९ - मुंब्रा-कळवा - श्री.मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रिडा संकूल कौसा-मुंब्रा (बॅटमिंटन हॉल) 
१५० - ऐरोली - सरस्वती विद्यालय सेक्‍टर-५, प्लॉट नं-१३ ऐरोली, नवी मुंबई 
१५१ - बेलापूर - आग्री-कोळी सांस्कृतिक भवन, वाजीराणी नॅशनल ॲकॅडमी स्पोर्टस सेक्‍टर-२४, नेरुळ, नवी मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com