निवडणुकीमुळे व्यापाऱ्यांचे "दिवाळे' 

अमित गवळे
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

निवडणूक प्रचारामुळे दिवाळीचा विसर पडल्यासारखे वाटत आहे. निकालात कुणाचे फटाके फुटणार आणि कुणाचा बार फुसका ठरणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे, असे तुषार पाटील या तरुणाने सांगितले. निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत सणाची कोणतीच पूर्वतयारी करू शकत नाही, असे किरण खंडागळे या कार्यकर्त्याने सांगितले. 

पाली : विधानसभा निवडणुकीवर अनेकांनी लक्ष केंद्रीत केले असल्याने दिवाळी अवघ्या आठवड्यावर आली असतानाही बाजारपेठांत शुकशुकाट आहे. त्यामुळे व्यापारी चिंतातुर झाले आहेत. ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात व्यग्र आहेत. सर्वसामान्यांचेही लक्ष या महत्त्वाच्या घडामोडीकडे लागले आहे. त्यामुळे दुकाने सजली असली तरी ग्राहक तेथे दिसत नाहीत. 

निवडणूक प्रचारामुळे दिवाळीचा विसर पडल्यासारखे वाटत आहे. निकालात कुणाचे फटाके फुटणार आणि कुणाचा बार फुसका ठरणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे, असे तुषार पाटील या तरुणाने सांगितले. निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत सणाची कोणतीच पूर्वतयारी करू शकत नाही, असे किरण खंडागळे या कार्यकर्त्याने सांगितले. 

आकाश कंदील, पणत्या, सजावट साहित्य, रांगोळ्या विकणाऱ्या मुकुंद दुबे या दुकानदाराने सांगितले की, या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. गेल्या वर्षी दिवाळीच्या दहा-बारा दिवस आधी चांगला व्यवसाय झाला होता. यंदा तोटा होण्याची भीती आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election traders 'bust'