मुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडणूक लागल्यात

मुंबई महापालिकेतील विविध समित्यांच्या निवडणूक लागल्यात

मुंबई,ता.24: मुंबई महानगपालिकेच्या समित्यांच्या निवडणुका 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. कॉग्रेसने अद्याप भुमिका स्पष्ट न केल्याने आत निवडणुकित अधिकच रंगत आली आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होतात. मात्र, यंदा कोविडमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. राज्य सरकारने आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची सुरवात 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असून 5 ऑक्टोबर रोजी शिक्षण आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरपर्यंत या निवडणुका सुरु राहाणार आहेत.

भाजपने यावेळी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कॉग्रेसकडून अजून भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. राज्यात महाविकास आघाडी आहे. पालिकेत आम्ही विरोधातच आहोत. अशी भुमिका कॉंग्रेसकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसह इतर विरोधीपक्ष स्वतःचा उमेदवार उतरवणार का भाजपच्या उमेदवाराला पाठींबा देणार हेही स्पष्ट नसल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

अशा होणार निवडणुका 

  • स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष : 5 ऑक्टोबर
  • बेस्ट आणि सुधार समिती अध्यक्ष  : 6 ऑक्टोबर 
  • स्थापत्य शहर आणि स्थापत्य उपनगर समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष  : ७ ऑक्टोबर 
  • सार्वजनिक आरोग्य आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष उपाध्यक्ष  : ८ ऑक्टोबर 
  • विधी आणि महिला व बालविकास समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष  : .९ ऑक्टोबर 
  • १७ प्रभाग समित्या : १४ ते  १६ ऑक्टोबर

election of various department presidents in BMC to start from 5th October

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com