सहकारी संस्थांच्या मार्चनंतर निवडणुका; कोरोना संकटामुळे पुन्हा लांबवणीवर 

सकाळ न्यूज नेटवर्क 
Tuesday, 19 January 2021

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 47 हजार सहकारी संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका आता 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.

मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 47 हजार सहकारी संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका आता 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कोरोना आटोक्‍यात येण्यास काही काळ लागणार आहे. निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीने त्या 31 डिसेंबर 2020पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला होता. आता पुन्हा 31 मार्चपर्यंत त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याच्या सहकार विभागाने तसे प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

47 हजार संस्थांच्या निवडणुका प्रलंबित 
राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ अशा "अ' वर्गातील 116 संस्था, सहकारी नागरी बॅंका, क्रेडिट सोसायटी अशा "ब' वर्गातील 13 हजार 85 संस्था, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा "क' वर्गातील 13 हजार 74 संस्था, ग्राहक संस्था आणि कामगार संस्था अशा "ड' वर्गातील 21 हजार संस्था मिळून एकूण 47 हजार 276 संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. 

Elections after March of co operatives On prolongation again due to corona crisis

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections after March of co operatives On prolongation again due to corona crisis