मतपत्रिका वापरून निवडणूक घ्यावीः उद्धव ठाकरे

uddhav thackeray
uddhav thackeray

मुंबईः निवडणूका मत पत्रिकेवर घेऊन भारतीय जनता पक्षाने सर्वांच्या मनातला संशय काढून टाकावा. एकदा होऊनच जाऊद्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाने मतपत्रिका घेऊन निवडणूका घ्याव्यात म्हणजे सर्वांच्या मनातील संशय निघून जाईल. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने चांगले यश मिळवले असले तर भाजप निवडणूका जिंकते मात्र पोटनिवडणूका हरत आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मेहनत घतेली.

यापूर्वी विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर इव्हीएमला दोष देण्यात आला होता. उत्तर प्रदेशात भाजपने विजय मिळविल्यानंतर मायावती यांनी इव्हीएममुळेच भाजप जिंकल्याचे म्हटले होते. इतर राज्यांतही इव्हीएमलाच दोष देण्यात आला होता. आता कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर राज ठाकरेंसह काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनीही इव्हीएममुळेच भाजप जिंकल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करत हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (इव्हीएम) विजय असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com