
Electric Double Decker Bus : आजपासून इलेक्ट्रिक दुमजली बस सेवा सुरू
मुंबई : मुंबईकर प्रवाशांचं लक्ष लागून राहिलेली इलेक्ट्रिक डबल डेकर बस आजपासून (सोमवार) सुरू होत आहे.बेस्टच्या कुलाबा आगारात या डबल डेकर बस सेवेला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नवीन डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दाखल झाली होती. बेस्टच्या ताफ्यात ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश होणार असून टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.
लंडन शहरामधील डबल डेकर बस सारखाच या बसचा लूक आहे. डबल डेकर बसला दोन जिने असून बस मध्ये चढणे आणि उतरणे प्रवाश्यांसाठी सोईचे होणार आहे. बस ला मोठमोठ्या पारदर्शक काचा असल्याने प्रवाश्यांना बस मधून मुंबईचे दर्शन होणार आहे. यात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहेत.युरोप मध्ये धावणाऱ्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या धर्तीवर या अत्याधुनिक बस असल्याने मुंबईकरांना ही बस पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
नवीन डबल डेकर बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरून धावणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गांवर या बसेस धावणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या तीन मार्गांवर बस धावणार असली तरी टप्प्याटप्प्याने मार्गांमध्ये वाढ केली जाणार आहे.या बसचे किमान अंतरासाठी (म्हणजेच ५ किलोमीटर) भाडे हे ६ रुपये असणार आहे.