घरावर चढलेल्या चोरामुळे वीजवाहिनी पडून नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई - घरावर चढलेल्या चोराने तोल सांभाळण्यासासाठी उच्चदाबाच्या वीज वाहिनीला पकडले. त्याला विजेचा झटका लागून वाहिनी घरांवर पडली. यात तीन घरे उद्‌ध्वस्त झाली. चोर गंभीर जखमी झाला असून, पाच स्थानिक रहिवासी किरकोळ जखमी झाले. वडाळ्यातील सॉल्टपेन मार्गावरील आदर्श रहिवासी संघ येथील आडवा बाण चाळीत ही दुर्घटना घडली.

इजाज अनिश अहमद अन्सारी (वय 18) असे चोराचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने तो वडाळ्यातील आडवा बाण चाळीत सुनील थळे यांच्या घरावर चढला होता; परंतु पाय अडकल्याने तोल सांभाळण्यासाठी घरावर लटकणाऱ्या वीज वाहिनीला पकडण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र उच्चदाबाच्या प्रवाहामुळे तो भाजला आणि वीजवाहिनी थळे यांच्या घरावर पडली. मोठा आवाज झाल्याने रहिवासी भीतीने घराबाहेर पळाले. त्याचवेळी थळे यांच्या घरात शॉटसर्किटमुळे इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. त्यांच्या घराची भिंत पुरुषोत्तम माडये आणि रमेश माने यांच्या घरावर कोसळल्याने या दोन्ही घरांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत पाच रहिवासी किरकोळ जखमी झाले.

Web Title: electric shock to thief