वीजग्राहकांना करता येणार मीटर रीडिंगची खातरजमा

वीजग्राहकांना करता येणार मीटर रीडिंगची खातरजमा

मुंबई - वीजग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटरवाचन आणि देयकात अचूकता व पारदर्शकता असावी यासाठी महावितरणने पाऊल उचलले आहे. मीटरचे वाचन कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येईल, याची पूर्वसूचना ग्राहकांना एक दिवस आधी मोबाईलवर लघुसंदेशाद्वारे दिली जाणार आहे, त्यामुळे त्या वेळी ग्राहकांना उपस्थित राहून मीटरचे योग्य रीडिंग घेतले जात आहे की नाही याची खातरजमा करता येईल.

महावितरणने 2016 पासून मोबाईल ऍपद्वारे मीटर रीडिंग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांच्या वीजदेयकात अचूकता येऊ लागली आहे. ग्राहकांना आपल्या मीटरचे रीडिंग तत्काळ तपासता यावे, म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवर लघुसंदेशाद्वारे ग्राहकांना मीटर वाचनाची पूर्वसूचना एक दिवस अगोदर देण्यात येईल. सकाळी 8 ते 10 आणि 10 ते दुपारी 12 व दुपारी 12 ते 3 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 यापैकी कोणत्या वेळेत वीज मीटरचे रीडिंग घेतले जाईल, हे कळवले जाणार आहे.

महावितरणने काही दिवसांपासून पुण्यातील गणेशखिंड, रास्ता पेठ, कल्याण-एक, नागपूर शहर मंडल, वाशी व ठाणे (मुंब्राव्यतिरिक्त) या सहा मंडळांतील ग्राहकांना मीटर रीडिंगबाबत पूर्वसूचना देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. ज्या ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली नसेल; त्यांनी 9225592255 या क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com