अतिवृष्टीमुळे वसई परीसरात वीजपुरवठा खंडीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

महावितरण वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वसई-विरारच्या परिसिथतीवर सतत लक्ष ठेवुन आहे. परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

मुंबई : सोमवार पासुन मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पावसामुळे, वसई-विरार भागाला विजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे  खबरदारीचा उपाय योजना म्हणून तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतुने सदर उच्च दाब वीज केंद्राचा वीज पुरवठा सकाळी ०७.३० पासून बंद ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे वसई गाव, वसई प., नालासाेपारा पु./प., आचोळे ,विरार प. ,जुचंद्र, नवघर पु., वालिव आगाशे, मनवेलपाडा, अनाळा , या भागातील विजपुरवठा खंडित आहे. यामुळे महावितरणचे सुमारे ३ लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत. यातील काही भागाचा वीजपुरवठा हा अप्रिय घटना टाळण्यासाठी, सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. 

महावितरण वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वसई-विरारच्या परिसिथतीवर सतत लक्ष ठेवुन आहे. परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.

महावितरणचे ग्राहक गरजेनुसार 1912, 18001023435 व 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण करत आहे.

Web Title: electricity cut to Vasai due to heavy rain