विजेचा खेळामुळे  नवी मुंबईकर घामाघूम

विजेचा खेळामुळे  नवी मुंबईकर घामाघूम

नवी मुंबई - ऐन उकाड्यात नवी मुंबईत अनेक ठिकाणी  विजेचा लपंडाव सुरू आहे.  दिवसातून तीन ते चार वेळा १५ ते २० मिनिटे वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

काही दिवसांमध्ये पारा पस्तिशीपार असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास पंखे, कुलर, एसी सुरू होत असल्याने विजेची मागणी वाढत आहे. त्यातच अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या रागाचा पाराही चढत आहे. 

नेरूळ येथील रहिवासी मनीषा जाधव यांनी सांगितले की, हिवाळ्यात वीज अर्ध्या-एक तासासाठी खंडित झाली तरी काही वाटत नाही. पण उन्हाळ्यात १०  मिनिटे वीजपुरवठा बंद  झाला तरी उकाड्याने हैराण व्हायला होते. 

जुईनगर येथील अनिता वाघ यांनी सांगितले की, सकाळच्या सुमारास वीज गेल्याने स्वयंपाकघरातील कामे खोळंबतात. गॅससमोर उभे राहून स्वयंपाक करताना उकाड्याने लाहीलाही होते. त्यातच वीज खंडित होत असल्याने मनस्ताप वाढतो.

याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने  सांगितले की, तापमान वाढल्यानंतर अनेक ठिकाणी फ्यूज उडण्याचे; तसेच ट्रीपिंग होण्याचे प्रकार वाढतात. सध्या पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळेही अनेकदा वीज खंडित होते. मात्र कुठेच तासभर किंवा पाच-सहा तासांसाठी वीज खंडित झालेली नाही. मागणीनुसार वीजपुरवठा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com