उल्हासनगरात अनाथ मुलांसोबत दहीहंडीला इलेक्ट्रॉनिक मीडियाची परंपरा

Electronic media tradition of Dahihandi with orphans in Ulhasnagar
Electronic media tradition of Dahihandi with orphans in Ulhasnagar

उल्हासनगर - आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ-निराधार असलेल्या लहान मुलांसोबत दहीहंडीचे आयोजन करून त्यांना सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थित जिव्हाळा देण्याची परंपरा उल्हासनगरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया गेल्या 7 वर्षांपासून राबवत आहे.

अमर शिंदे, सोनू शिंदे, सुनील अजगावकर, सॅमसन घोडके, प्रकाश सोनवणे आदी स्थानिक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या टीमच्या पुढाकाराने उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील शासकीय अनाथालयात शिक्षण घेत असलेल्या अनाथ मुलांसोबत दहीहंडीचे आयोजन करतात. यंदाचे त्यांचे हे 7 वे वर्ष आहे. त्यांना दहीहंडीसाठीचे नवीन टीशर्ट देण्यात येते. अनाथ मुलांनी दहीहंडी फोडल्यावर त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. या दहीहंडीला सर्व पक्षीय प्रतिसाद देऊन आणि उपस्थित राहून इलेक्ट्रॉनिक मीडियाला शाबासकी देतात व अनाथ मुलांसोबत सहभागी होतात.

आजच्या दहीहंडी प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर,शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उद्योगपती सुमित चक्रवर्ती, धिरज आयलानी, शिवसेना शहर संघटक संदीप गायकवाड, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,शाखाप्रमुख सुनील (कलवा) सिंह, मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार, शिवसैनिक सागर उटवाल आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com