अकरावी ऑनलाइनबाबत पुस्तिका आठवडाभरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची माहिती देणारी पुस्तिका आठवडाभरात उपलब्ध होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागातील सूत्रांनी दिली.

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची माहिती देणारी पुस्तिका आठवडाभरात उपलब्ध होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागातील सूत्रांनी दिली.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, असा प्रश्‍न पालक विचारत होते. सोमवारपासून या प्रक्रियेला सुरवात होईल, अशी चर्चा सुरू होती; परंतु या प्रक्रियेतही दिरंगाई होणार असल्याचे समजते. संकेतस्थळ सुरू न झाल्याने पालकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. अशा वेळी अकरावी ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती देणारी पुस्तिका कधी मिळणार, असा सवाल विचारला जात होता. आठवडाभरात विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी माहिती पुस्तिका मिळेल, असे सांगण्यात येत आहे. दरवर्षी ही पुस्तिका मे महिन्याच्या सुरवातीला मिळते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदापासून अकरावी प्रवेशासाठी नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार या प्रवेशाची संपूर्ण जबाबदारी नोएडा येथील नाएसा कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने यंदाही ही वेबसाइट पूर्णपणे नव्याने तयार केली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशाच्या पुस्तिकेतच विद्यार्थ्यांना त्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड दिले जातील.

Web Title: eleventh online books in week