अकरावी, बारावीचीही पुस्तके बदलणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - पहिली ते दहावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना 2019-20 साठी अकरावी आणि बारावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे. अभ्यास मंडळासाठी सदस्यांची निवड प्रक्रियाही विद्या परिषदेकडून सुरू करण्यात आली आहे.

यंदा दहावी, आठवी आणि पहिलीचे पुस्तक बदलणार आहे. त्यानंतर अकरावी आणि बारावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

विज्ञान शाखेची पुस्तके 2012-13 मध्ये; तर वाणिज्य आणि कला शाखेची पुस्तके 2013-14 मध्ये बदलण्यात आली होती. त्यानंतर आता 2019-20 या शैक्षणिक वर्षांत अकरावीचे नवे पुस्तक, तर 2021-22 मध्ये बारावीचे नवे पुस्तक लागू होणार आहे. आता येणारी पुस्तके ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा नजरेसमोर ठेवून करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.

Web Title: eleventh twelth books changes