ओबीसी जनगणनेसाठी एल्गार, दळखण ग्रामस्थांची 'पाटी लावा मोहीम' 

दळखण येथील प्रत्येक घरावर ओबीसी एल्गारच्या पाट्या लावून अनोखा निषेध व्यक्त केला जात आहे. (छायाचित्र - नरेश जाधव)
दळखण येथील प्रत्येक घरावर ओबीसी एल्गारच्या पाट्या लावून अनोखा निषेध व्यक्त केला जात आहे. (छायाचित्र - नरेश जाधव)

खर्डी : प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शहापूर तालुक्‍यातील दळखण येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वैशाली म्हसकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण गावकऱ्यांनी घरासमोर "2021 च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही', OBC (NT, VJNT, SBC) चा जनगणनेत सहभाग नाही' अशा आशयाच्या पाट्या लावून निषेध व्यक्त केला. जर सरकार ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करणार नसेल तर येणाऱ्या जनगणना कार्यक्रमास असहकार करणार असल्याचा इशारा दिला आहे. 

विदर्भात ऍड. अंजलीताई साळवे-विटणकर यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही "पाटी लावा मोहीम' मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रासह आता कोकणातही जोर धरू लागली आहे. त्याची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यात झाली असून हे लोण आता गावोगावी पसरून संपूर्ण कोकणातील प्रत्येक गावात अशा पद्धतीने पाट्या लावून असहकाराचा इशारा सरकारला दिला जाणार आहे. जर केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करण्याचे नाकारले, तर ओबीसी समाजाकडून जनगणनेवर सामूहिक बहिष्कार टाकला जाऊन येणारी 2021 ची जनगणना अडचणीत येण्याची दाट शक्‍यता आहे. 

ओबीसी जनगणना झाल्यास 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकसंख्या असल्याचे सिद्ध होईल. अधिकृत लोकसंख्या नसल्याने इतर सरकारी सुविधा मिळत नाहीत, त्या मिळविण्यासाठी प्रयत्न करता येईल. राजकीय व शैक्षणिक आरक्षण मिळेल.

तरुणांना रोजगारासाठी आर्थिक मदत मिळेल, शैक्षणिक शुल्क माफ होईल, स्कॉलरशीप मिळेल व निवडणुकीत वॉर्ड, मतदारसंघ आरक्षित होतील. अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आवश्‍यक असल्याने तालुक्‍यातील प्रत्येक गावात अशा पाट्या लावण्याचे आवाहन ओबीसी संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. 

सदर "पाटी लावा' कार्यक्रमाप्रसंगी ओबीसी संघर्ष समितीचे दत्ता पाटील, रेखाताई पाटील, पुरुषोत्तम ठाकरे, अनिल भोईर, भरत निचिते, ज्ञानेश्वर चंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना जनगणनेच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com