एल्गार परिषद प्रकरण: फादर स्टेन स्वामींना जामीन नाहीच

Stan-Swamy
Stan-Swamy
  • स्वामी यांना उपचारासाठी 18 जूनपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई: एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांना उपचारासाठी 18 जूनपर्यंत होली फॅमिली रुग्णालयात ठेवावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. 84 वर्षीय स्वामी यांना कोरोना झाला आहे. स्वामी मागील ऑक्टोबरपासून तळोजा कारागृहात आहेत. त्यांना पार्किसन्ससह विविध आजार आहेत. या कारणावरून जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र सध्या त्यांना नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Elgar Parishad Case Accused Father Stan Swami gets no bail Hospital Treatment period extended)

Stan-Swamy
तिसऱ्या लाटेसाठी नेस्को जंबो कोविड केंद्रात 400 बेड्स

स्वामी यांच्या वतीने अँड. मिहिर देसाई यांनी आज न्या. एस एस शिंदे आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाला माहिती दिली. त्यांना कोरोनाची लागण झाली असून आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. खंडपीठाने ही मागणी मान्य केली. तसेच रूग्णालयाने याबाबत वैद्यकीय अहवाल दाखल करावा, असे निर्देश खंडपीठाने दिले.

राज्य सरकार आणि NIA च्या वतीने जामीनाच्या मागणीला विरोध करण्यात आला. स्वामी यांना NIA ने झारखंडमधून अटक केली होती. अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Stan-Swamy
ते काय 'दूध के धुले' आहेत का? - महापौर किशोरी पेडणेकर

कोण आहेत फादर स्टेन स्वामी?

फादर स्टेन स्वामी हे गेल्या ५० वर्षांपासून झारखंडमध्ये कार्यरत आहेत. मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकप्रिय आहेत. मूळचे केरळचे असलेले फादर स्टेन स्वामी सध्या महाराष्ट्रातील जेलमध्ये आहेत. झारखंडमध्ये नक्षलींशी संबंध असल्याचे खोटे आरोप काही आदिवासी लोकांवर केले जात असून त्यांच्या सुटकेसाठी ते कायम कार्यरत असल्याचे त्यांचे समर्थक म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com