ईमानला खुर्चीत बसून जेवता यावं यासाठी प्रयत्न

EMAN AHMED
EMAN AHMED

मुंबई : तब्बल 500 किलो एवढे वजन असणारी जगातील सर्वांत वजनदार महिला ईमान अहमद भारतात आली आणि चालत घरी गेली असं स्वप्न रंगवू नका. अशी कोणतीही जादू होणार नाही. ईमानला असलेल्या आजारांवर मात करत तिच्यावर उपचार करायचे आहेत. पहिल्या टप्प्यात ईमान खुर्चीत बसून तिच्या हाताने जेऊ शकेल एवढं लक्ष्य पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आल्याचं ईमानवर उपचार करणारे डॉ. मुफज्जल लकडावाला यांनी सांगितले. 

ईमानचं वजन आणि तिचा बीएमआय या दोन गोष्टींवर मात करणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ शस्त्रक्रिया करुन हे साध्य होणार नाही. त्यासाठी पद्धतशीर उपचारपद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. ईमानवर सोमवारपासून रुग्ण म्हणून आवश्यक उपचार देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला तिच्या तपासण्या आणि चाचण्यांवर भर दिला आहे. तिच्या जेनेटिक चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर तिच्या जाडीचे कारण समोर येईल आहे. त्यानंतर उपचार आणि औषधांची दिशा निश्चित होईल असे. त्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागेल. जेनेटिक रिपोर्टच्या आधारे तिच्यावर शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यापूर्वी ईमानचे वजन कमी करण्यासाठी तिच्या शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यात येईल. यासाठी तिला डाएटवर ठेवण्यात आलं आहे. 


सहा महिन्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. मात्र, केवळ बेरिअॅट्रीक शस्त्रक्रियेने तिचं वजन कमी होणार नाही. त्यासाठी ईतर पर्यायांचाही विचार करण्यात येणार आहे असे डॉ. मुफ्फज्जल लकडावाला यांनी सांगितले. यासाठी प्राथमिक टप्प्यात तिचे वजन वाढविण्यास कारण असलेल्या शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होईल. सुरुवातीला वजन कमी करण सोप्प असेल. त्यानंतर तिच्यातील बदलांनुसार शस्त्रक्रियेबाबत विचार करण्यात येणार आहे. सर्वसामान्य रुग्णांमध्ये एक तासाच बेरिअॅट्रीक शस्त्रक्रिया पूर्ण होते मात्र ईमानच्या केसमध्ये हा दोन ते अडीच तासाचा कालावधी लागू शकतो. शस्त्रक्रिये दरम्यान जास्त वेळ अॅनेस्थेशिया देणं ईमानच्या प्रकृतीसाठी धोक्याचं ठरू शकतं असेही डॉ. लकडावाला यांनी नमूद केले. या सर्व प्रयत्नांनंतर ईमान खुर्चीत बसून घरी जाऊ शकते. हा प्राथमिक टप्पा पार केल्यानंतर साधारण एक ते दीड वर्षांनी तिच्यावर शस्त्रक्रिया होईल. ज्यानंतर ती चालू फिरू शकेल, असे डॉ. लकडावाला म्हणाले. 

हा रस्ता सोप्पा नाही; काहीच ठरलेलं नाही 
ईमानची प्रकृती
- बीएमआय 252 आणि सर्वसामान्यांमध्ये 24 बीएमआय असतो
- ईमानचं पोटॅशियम, युरीक अॅसिड आणि क्रिएटीन चाचण्यांचे रिपोर्ट चांगले नाहीत
- ईमानला हायपर थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधूमेह, सिव्हिअर स्लिप अॅप्नेया हे आजार आहेत. 
- सुरुवातीच्या टप्प्याय या आजारांना नियंत्रणात आणणं अत्यावश्यक आहे 
- ईमानला डाएटवर ठेवण्यात  आलं आहे. प्रोटीन लिक्विड डाएट आमि फायबर तसेच डेअरी प्रोडक्ट तिला देण्यात येतात. 
ईमानला भारतात आणताना ही तयारी केली. 
- ईमानचं पोटॅशियम आणि क्रिएटीन नियंत्रणात आणलं 
- पहिल्या मजल्यावरील घराची भिंत फोडून तिच्या बेडसह तिला घरापासून खाली 40 फूटावर असलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलं. 
- या सर्व प्रवासाचा खर्च 83 लाख रुपये झालं. 
- मॉस्को या कंपनीच्या मदतीने ईमानसाठी ट्रक, बेड, आणि तिला खाली उतरवण्यासाठी यंत्रणा मिळविण्यात आली 
- दोन्ही देशातील संबंधित यंत्रणांकडून आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या. 
- कार्गोमध्ये प्रवास करताना गुरुत्वाकर्षणामुळे विमानात असलेल्या ईमानचा वजन पेलवेल यासाठी एक चौकट तयार कऱण्यात आली ज्याने ईमानला ती घरात असल्याचा फिल मिळेल 
- अकरा बॅगांमध्ये सुमारे 300 किलोग्रॅम वजनाचे वैद्यकीय यंत्रसामुग्री ठेवण्यात आली होती. 

ईमानसाठी टीम सज्ज 
ईमानसाठी सुमारे 16 जणांची टीम काम करत आहे. तसंच तिच्या दैनंदिन गरजेच्या गोष्टींसाठी सहा परिचारिकांची टीम सज्ज करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हार्वड, मेलबर्न अशा ठिकाणच्या सहा तज्ज्ञ डॉक्टरांचं मंडळ तयार करुन प्रत्येक निर्णयाआधी त्यांच्याशी चर्चा करण्यात येते.  

तिचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान 
ईमानचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. एकदा तिला कुशीवर वळवत असताना ती अचानक हसायला लागली. तिच्या बहिणीने तिला विचारल्यावर तिने याचं उत्तर दिलं. घरी तू आणि आई दोघीच मला एका कुशीवर वळवू शकत होत्या. इथे सहा जणांना हे जमत नाही. 
- डॉ. शैला शेख, जेनेटिक तज्ज्ञ  

या सीझनचा शेवटचा आंबा तिने खाल्ला 
ईमान इथे सुट्टीवर आल्यासारखी आहे. इतक्या वर्षांनंतर तिला घरातून बाहेर काढल्याने तिला लगेच औषधोपचारांचा मारा करणं योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग 48 तास तिला 'कम्फर्टेबल' होण्यासाठी दिला. तिने आंबा मागितला होता. त्यावेळी तिला या सीझनचा शेवटचा आंबा असं सांगितलंय 
- डॉ. मुफ्फझल लकडावाला, बेरिअॅट्रिक सर्जन

घरातून बाहेर काढल्यावर डॉक्टरांचं हार्ट बीट वाढलं 
ईमानला घरातून हलवणं हे सोप्प नव्हतं. सर्व तयारी झाली होती. मात्र पहिल्या मजल्यावरील घरातून ईमानला फुटपाथवर उभ्या असलेल्या ट्रकच्या दिशेने नेताना ते सुव्यवस्थित व्हावं एवढीच काळजी होती. त्या काही मिनिटात आमच्या हृदयाचे ठोके 120 च्या वेगाने पळत होते. जेव्हा ईमानला ट्रकमध्ये ठेवलं तिच्या हृदयाचे ठोके मिनिटाला 80 या गतीने पळत होते. 
- डॉ. अपर्णा गोवील भास्कर, लॅप्रोस्कोपिक सर्जन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com