इमान अहमद आता मुंबईहून अबु धाबीला रवाना

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

बुधवारी सायंकाळी इमानचे कुटुंब आणि अबु धाबी येथील VPS हेल्थकेअर हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांना इमानवर सुरू असणारे उपचार, औषधे आदी माहिती देण्यात आली.

मुंबई : जगातील सर्वाधिक लठ्ठ महिला अशी काही दिवसांपूर्वी ओळख असलेल्या इमान अहमद हिला आज (गुरुवार) सैफी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तिची बहीण तिला येथून अबु धाबीला घेऊन जाणार आहे.

500 किलो वजन असलेल्या इमानचे वजन 171 किलोवर आले आहे. तिची प्रकृती स्थिर असून, तिला विमानाने प्रवास करता येईल, असे सैफी रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) हुझेफा शहाबी यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी इमानचे कुटुंब आणि अबु धाबी येथील VPS हेल्थकेअर हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांना इमानवर सुरू असणारे उपचार, औषधे आदी माहिती देण्यात आली. सकाळी 10.30 वाजता डिस्चार्जची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी सांगितले की, या रुग्णालयाने 48 तासांची मुदत देण्याची मागणी व्हीपीएस हेल्थकेअर रुग्णालयाकडे केली होती. सामान्यतः 12 ते 24 तासांची मुदत देण्यात येते; मात्र इमानवर 13 डॉक्‍टरांचे पथक उपचार देत असल्याने आणि यापूर्वी तिची बहीण शायमा हिने डॉक्‍टरांवर केलेल्या आरोपांमुळे खबरदारी म्हणून जास्त अवधी ठेवण्यात आला.

बुर्जील येथील व्हीपीएस हेल्थकेअरमधील 15 डॉक्‍टरांचे पथक आता इमानवर उपचार करणार आहे. मुंबई ते अबु धाबी प्रवासात हे पथक इमानसोबत असेल.

Web Title: eman ahmed flies to abu dhabi after shedding 324 kg