पोलिसांच्या ताफ्यात कमांड सेंटर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - मुंबई पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन इमर्जन्सी रिसपॉन्ड मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल कमांड सेंटर दाखल झाली आहेत. त्याद्वारे घटनास्थळाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. 

मुंबई - मुंबई पोलिसांच्या ताफ्यात पाच नवीन इमर्जन्सी रिसपॉन्ड मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल कमांड सेंटर दाखल झाली आहेत. त्याद्वारे घटनास्थळाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. 

मुंबई पोलिस आयुक्तालय कार्यालयात बुधवारी (ता. २७)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डायल १००’ या अत्याधुनिक यंत्रणेसह विविध उपक्रमांचे लोकार्पण झाले. त्या वेळी त्यांनी या इमर्जन्सी रिसपॉन्ड मोबाईल सर्व्हिलन्स कंट्रोल कमांड सेंटरलाही हिरवा कंदील दाखवून औपचारिक उद्‌घाटन केले. यापूर्वीच दोन कमांड सेंटर पोलिस सेवेत कार्यरत आहेत. त्यांचा उपयोग महत्त्वाच्या घटनांच्या वेळी केला जातो. नवी पाच कमांड सेंटर ही पाच प्रादेशिक विभागांना दिली जाणार आहेत. डायल १०० ही अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे गरजूंना लवकर मदत मिळते, अशी माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली. या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, रणजित पाटील, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, आमदार राजपुरोहित यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Emergency Respond Mobile Servilence Control Command