कर्मचारी संपाचा शस्त्रक्रियांना फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई -  सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा बऱ्यापैकी कोलमडली. कामा आणि जीटी रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया पार पडली नाही. आपत्कालीन शस्त्रक्रिया न आल्याने एकही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, असा दावा दोन्ही रुग्णालयांकडून केला गेला आहे. 

संपामुळे बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णालयीन प्रशासकीय कामकाज सांभाळताना शिकाऊ परिचारिका तसेच एमबीबीएस विद्यार्थ्यांचा कस लागला होता. जेजे रुग्णालयाने दुसऱ्या दिवशीही कामकाज सांभाळण्याचे आव्हान व्यवस्थित सांभाळल्याचे चित्र होते. जीटी रुग्णालयात काल कंत्राटी कामगारांना बोलावून साफसफाई पार पडली. बुधवारी मात्र त्यांना सुटी देण्यात आली. आज साफसफाईची गरज नसून रुग्णालयीन परिसर स्वच्छ असल्याचा दावा जीटीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास मैंदड यांनी केला. जीटीत आज केवळ 17 रुग्णच दाखल झाले, तर 575 रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार मिळाले. 

जेजेत बाह्यरुग्ण विभागात तब्बल 2 हजार 917 रुग्णांना उपचार दिले गेले, तर 12 शस्त्रक्रियाही पार पडल्या, तर चार गर्भवती महिलांची प्रसूती व्यवस्थित पार पडली. सेंट जॉर्ज रुग्णालयातही सहा शस्त्रक्रिया आज पार पडल्या, तर 667 रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार मिळाले.

Web Title: Employee strikes affected surgery