कांदळवनातून रोजगाराच्या संधी - मुनगंटीवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - कांदळवनात उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा सखोल अभ्यास करून त्याचा सर्वंकष विकास आराखडा महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या पुढील बैठकीत सादर करा, असा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी दिला.

प्रतिष्ठानची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, वन सचिव विकास खारगे, मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) एन. वासुदेवन व सदस्य उपस्थित होते. कांदळवनातून उपजीविकेचे उत्तम साधन मिळणार असेल तर, कांदळवन शाप नाही, वरदान आहे हे लोकांना त्यांच्यापर्यंत जाऊन सांगा म्हणजे त्यांच्याकडून कांदळवनाची हानी होणार नाही. कांदळवनात चिखलातील खेकडा शेती, कालवं शेती, मासेमारीसारखे उपक्रम जर उत्तमरीतीने राबविले तर यातून उत्तम रोजगार निर्मिती होऊ शकते. तसेच कांदळवन पर्यटनाचा विचार करताना पौष्टिक, पोषण आहाराच्या दृष्टीने या शेतीतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांचा कसा आणि कुठे वापर करता येईल हे देखील पाहिले जावे, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

Web Title: employment opportunities - Mungantiwar