मुंब्य्रातील तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्‍न

मुंब्य्रातील तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्‍न

ठाणे - आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून मुंब्रा येथील पाच जणांना दहशतवादीविरोधी पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. यामुळे मुंब्रा शहराचे आयसिसशी असलेला संबंध पुन्हा उघड झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये एटीएसने मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. दहशतवादाशी संबंध असल्यामुळे मुंब्य्राबाबत नकारात्मक संदेश जात असून, येथील तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

दहशतवादी कृत्यांमुळे उजेडात आलेल्या आयसिस या संघटनेने आपली पाळेमुळे जगभरात रोवली आहेत. या संघटनेचे भारतातील मुंब्रा संबंध पुन्हा एकदा उघड झाला आहे. एटीएसने मुंब्रा येथून ताब्यात घेतलेले सर्व तरुण सुशिक्षित आहेत. २०१६ मध्ये मुंब्य्रातून मुदब्बीर शेख याला आणि त्यानंतर मुंब्य्रातीलच मोहम्मद फरहान शेख या तरुणाला राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) दिल्ली विमानतळावरून अटक केली होती. 

मोहम्मह हा दुबईत संगणक अभियंता म्हणून कामही करत होता. हे दोघेही आयसिसच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना अटक झाली होती. त्यानंतर मोहम्मद तांबे हा तरुणही आयसिसमध्ये सामील झाल्याचे समोर आले होते. मंगळवारी एटीएसने केलेल्या कारवाईनंतर मुंब्रा शहर पुन्हा चर्चेत आले आहे. अनेक कंपन्यांनी मुंब्रा शहराला काळ्या यादीत टाकले आहे. ‘मुंब्य्रात राहतो!’ असे कळल्यानंतर अनेकांना नोकरी नाकारण्यात येते असा स्थानिकांचा अनुभव आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये येथील तरुणांसमोर रोजगार मिळविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

एटीएसने कारवाई करून अवघे दोन दिवस झालेले आहेत. लवकरच एटीएसशी आम्ही संपर्क करून त्यांच्या मदतीने मुंब्य्रामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविणार आहोत. 
- दीपक देवराज, पोलिस उपायुक्त, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com