मुंबई : जयपूर एक्स्प्रेसच्या कोचला आग

मुंबई : जयपूर एक्स्प्रेसच्या कोचला आग

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर सुपर फास्ट एक्स्प्रेसच्या एका कोचला आग लागल्याची घटना आज (ता.11 ) सायंकाळी घडली. ही एक्स्प्रेस कारखान्यामध्ये उभी असल्याने कोच रिकामे होते. म्हणून कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, कोचला नेमकी आग कशी लागली याचा तपास करण्यासाठी पश्चिम रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 

मुंबई सेंट्रल येथील रेल्वेच्या कारखान्यामध्ये 12955 जयपूर एक्स्प्रेस उभी होती. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या एक्स्प्रेसच्या बी 3 एसी थ्री टायरच्या कोचला आग लागली. संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. हा कोच रिकामा असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच कोचला लागून असलेला बी 2 कोच सुरक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

या घटनेमुळे गाडीच्या वेळेत बदल करुन गाडीला दुसरे कोच जोडून रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी रवाना करण्यात आली. या रिकाम्या कोचला नेमकी आग कशामुळे लागली याची चौकशी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये सेफ्टी, सुरक्षा, मॅकेनिकल आणि इलेक्ट्रिक विभागातील प्रत्येकी एक-एक अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com