Daya NayaK : 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' दया नायक दोन दशकांनंतर पुन्हा परत; 'इथे' झाली नेमणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daya Nayak

Daya NayaK : 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' दया नायक दोन दशकांनंतर पुन्हा परत; 'इथे' झाली नेमणूक

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा पोस्टींग मिळाली आगे. दया नायक यांना मुंबई पोलीसांच्या क्राइम ब्रांचमध्ये पोस्टींग मिळालं आहे. पदभार स्वीकारल्याची महिती स्वतः दया नायक यांनी ट्वीट करुन दिली आहे. शनिवारी त्यांना वांद्रे गुन्हे शाखेत पोस्टिंग मिळाले, जे मुख्य युनिट मानले जाते.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दया नायक यांनी शनिवारी मुंबई पोलीस क्राइम ब्रांच युनिट ९ मध्ये कार्यभार स्वीकरला आहे. आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दया नायक यांच्यासह इतर पाच अन्य आधिकाऱ्यांना पोस्टींग देण्यात आलं आहे. इतर पाच जणांना सुबुरबन मानखुर्द, मरीन ड्राइव्ह, कांदिवली आणि मुंबई ट्रॅफिक पोलिस येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

दया नायक यांनी ट्वीट करत महाराष्ट्र एटीएससोबत तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर मुंबई क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग जॉइन केल्याची माहिती धिली आहे.

दहशतवादी प्रतिबंधक पथकात (एटीएस)कार्यरत असलेले दया नायक यांची अलीकडेच मुंबई पोलिस दलात बदली झाली होती. मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून नायक परिचित आहेत. देवेन भारती यांच्या बदलीनंतर नायक हे पुन्हा मुंबई पोलिस दलात रुजू होतील, असा अंदाज होता. नायक यांची ‘एटीएस’मधून बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.

नायक यांच्यासोबत राज्य गुप्तवार्ता विभागातून बदली झालेल्या पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के यांची मानखुर्द पोलिस ठाणे, शिवाजी पाळदे यांची मरिन ड्राईव्ह, सलील भोसले यांची पूर्व नियंत्रण कक्ष, सोलापूर ग्रामीणचे प्रदीप काळे यांची बोरिवली पोलिस ठाणे आणि मनोहर आव्हाड यांची पूर्व नियंत्रण कक्षातून वाहतूक विभागात बदली झाली आहे.

तस्कराविरुद्ध विशेष मोहीम

दया नायक यांनी संघटित टोळीतील अनेक गुंडांसह ‘लष्करे तोयबा’च्या दहशतवाद्यांचा चकमकीत खातमा केला. गुंड टोळ्यांकडून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा जप्त करून अनेक गुन्हे उघडकीस आले होते. अंबोली ठाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली होती.

'अब तक 56'

दया नायक यांनी त्यांच्या पोलीस कारकिर्दीत ८४ एन्काउंटर केले आणि हजाराहून अधिक गुन्हेगारांना अटक केली. महाराष्ट्र एटीएसमध्येही त्यांनी सुमारे साडेतीन वर्षे काम केले. राम गोपाल वर्मा यांच्या 'अब तक 56' या चित्रपटातील मुख्य भूमिकेबाबत नेहमीच वाद होत आहेत. एकेकाळी दया नायकचे बॉस असलेले प्रदीप शर्मा म्हणाले की, अब तक ५६ चित्रपटातील मुख्य पात्र त्याच्यावर केंद्रित आहे. तर दया नायक यांच्या जवळच्या मित्रांचा असा दावा आहे की या चित्रपटातील मुख्य पात्राची पार्श्वभूमी दया नायकच्या अवतीभवती होती.