एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा

ठाणे : मुंबई पोलिस दलात सर्वाधिक गुंडांना मारणारे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी पोलिस दलातील सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. आता ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहेत. पोलिस सेवेत असताना प्रदीप शर्मा यांनी तब्बल 113 गुंडांचा एन्काऊंटर केले होते. 

'लष्कर-ए-तैयबा'च्या तीन अतिरेक्‍यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुप्रसिद्ध गुंडांचा एन्काऊंटर शर्मा यांनी केला होता. सहा महिन्यांपूर्वी एका खंडणी प्रकरणात त्यांनी थेट कुप्रसिद्ध दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर यालाही अटक केली होती. प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलिस सेवेत दाखल झाले होते. त्यांचा बहुतांश कार्यकाळ हा मुंबईतील गुन्हे शाखा अथवा विशेष दलात गेला आहे. दोन वर्षांपासून ठाण्यात ते ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. शर्मा सहा महिन्यानंतर निवृत्त होणार होते; पण त्यापूर्वीच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शर्मा इच्छुक असल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. 

अंधेरी, साकीनाक्‍यातून उमेदवारी?

अंधेरी किंवा साकीनाका परिसरात त्यांचे सामाजिक काम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून या दोनपैकी एका मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह केला जात आहे. पण, त्याच वेळी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवताना त्यांना नालासोपाऱ्यातूनही संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com