इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची राजकारणात एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नालासोपारा : वसई, विरार नालासोपाऱ्यावर 1990 च्या दशकापासून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी  शिवसेना इन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारा विधानसभेत उतरवण्यासाठी यंत्रणाही सक्रिय झाली आहे. प्रदीप शर्मा यांनी पोलिस खात्यातून निवृत्ती घेण्याआधीच पावसाळी छत्र्यांच्या माध्यमातून नालासोपारा विधानसभेत त्यांची एन्ट्री झाली आहे. 

पालघर जिल्ह्यात सर्वात मोठा नालासोपारा विधानसभा क्षेत्र आहे. 4 लाख 87 हजार 560 एवढे सर्वाधिक मतदार आहेत. बहुभाषिक, बहुप्रादेशिक, लोक येथे राहतात. उत्तर भारतीय मतदान या मतदारसंघात सर्वाधिक आहे. हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर या मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार आहेत. उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून आणि हितेंद्र ठाकूर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना या मतदारसंघातून उतरविण्याची व्यूहरचना आखत आहेत.

शर्मा यांनी पोलिस निरीक्षकपदाचा राजीनामाही दिला आहे; पण तो अद्याप मंजूर झालेला नाही किंवा त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेशही झाला नाही. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पी. एस. फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रदीप शर्मा यांचा फोटो असलेल्या पावसाळी छत्रींचे वाटप सुरू झाले. त्यामुळे प्रदीप शर्मा यांची नालासोपाऱ्यात प्रत्यक्ष नसली, तरी अप्रत्यक्ष इन्ट्री झाली आहे. 

प्रदिप शर्मा यांच्याकडुन आम्हाला मोफत छत्री देण्यात आली आहे. ते या निवडणुकीत उभे राहणार आहेत, असेही आम्हाला सांगण्यात आले आहे. आणखी कुणाला पाहिजे असतील, तर मोफत छत्री घेवुन जा, असे आवाहन करण्यात येत आहे. 
- सुरज विश्‍वकर्मा, मनिश शर्मा, नागरिक विरार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encounter Specialist Pradeep Sharma's entry into politics