उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांचा अतिक्रमणातून मोकळा श्वास

दिनेश गोगी
शुक्रवार, 29 जून 2018

प्रभाग समिती 3 च्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे आठवड्यापूर्वीच गणेश शिंपी यांनी हाती घेतली आहेत.

उल्हासनगर - हातगाड्या,फळांची टोपले, चष्मे, कटलरी, कंबरी पट्टे आदींचे ठेले थाटून अतिक्रमण करणाऱ्या व विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर आज प्रभाग समिती 3 ने धडक कारवाई केली. त्यामुळे उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसराने प्रथमच अतिक्रमणाच्या विळख्यातून मोकळा श्वास घेतला आहे. प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी ही धडक केल्याने चाकरमानी सुखावून गेले आहेत.

स्थानकाच्या पुर्व व पश्चिम या दोन्ही दिशेला अनेकांनी ठेले थाटले आहेत. स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच ही मंडळी ठाण मांडून बसत असल्याने विशेषतः सायंकाळी किंबहूना रात्रीच्या सुमारास घर गाठण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्याना या ठेलेधारकांचा अडथळा नित्याने होतो. काही तर मध्यभागीच बस्तान मांडतात. विशेष म्हणजे या मंडळींवर अधून मधून कारवाई होते. मात्र अधिकारी कर्मचारी निघून जातात रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांचे जैसे थे चित्र दिसून येते.

प्रभाग समिती 3 च्या सहाय्यक आयुक्तपदाची सूत्रे आठवड्यापूर्वीच गणेश शिंपी यांनी हाती घेतली आहेत. त्यांच्याकडे स्टेशन परिसराच्या अतिक्रमणाच्या तक्रारी येताच शिंपी यांनी मुकादम श्यामसिंग, विश्वनाथ राठोड, चंदर धिरमलानी, रवी पाटील यांच्या सोबत स्टेशन भागाकडे मोर्चा वळवला आणि उभारलेल्या अतिक्रमणाची तोडफोड करून फळविक्रेत्यांना पळवून लावले.

चाकरमानी जेरीस आले होते अशी परिस्थिती अतिक्रमण व ठेल्यांमुळे झाली होती.यापुढे या परिसरात सतत वॉच ठेऊन अतिक्रमणे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार. असा इशारा गणेश शिंपी यांनी दिला.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The encroachment of both the directions of Ulhasnagar railway station has been removed