वाशीच्या फुप्फुसाला अतिक्रमणांचा कर्करोग

वाशीच्या फुप्फुसाला अतिक्रमणांचा कर्करोग

ऐरोली - झाडांसाठी राखीव भूखंड (ट्री बेल्ट) म्हणजे त्या शहराची फुप्फुसे; पण याच फुप्फुसांना निकामी करण्याचे काम सध्या वाशीतील सेक्‍टर- १२ येथे सुरू आहे. उपनगराला ऑक्‍सिजनचा मुबलक पुरवठा करणाऱ्या या सुमारे सव्वाआठ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर वाहन पार्किंग, राडारोड्याचे अतिक्रमण झाले आहे. हा परिसर मद्यपींचा अड्डाही झाला आहे. 

वाढत्या प्रदूषणावर मात करता यावी आणि शहरातील नागरिकांना भरपूर ऑक्‍सिजन मिळावा यासाठी पालिकेने ठिकठिकाणी वृक्षपट्ट्यांसाठी काही भूखंड राखीव ठेवले आहेत. त्यापैकी तीन ठिकाणे वाशी विभागात आहेत. परंतु शहरातील भूमाफियांनी त्यासुद्धा बळकवायला सुरुवात केली आहे.

वाशी सेक्‍टर- २८ मध्ये दोन भूखंड वृक्ष-पट्ट्यासाठी राखीव आहेत. त्यापैकी एक १५०० चौरस मीटर आणि दुसरा ७ हजार ३५९ चौरस मीटर आहे; तर सेक्‍टर- १२ येथे एक भूखंड आहे.  भूखंड क्रमांक ७८ हा  ८ हजार  २७८ चौरस मीटरचा भूखंड खाडी किनाऱ्याजवळ आहे. परंतु या भागाकडे पालिकेने सुरुवातीपासून दुर्लक्ष केल्याने त्यावर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. 

काहींनी या  भागावर त्यांच्या महागड्या गाड्या पार्क करण्यासाठी कुंपण घालून प्रवेशद्वारही तयार केले आहे; तर काही ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.  तरच काही भागावर राडारोडा माफियांनी राडारोड्याचे डोंगर उभे केले आहेत. अनेक वेळा या भागात दारूच्या पार्ट्या होतात. 

उद्यान विभागाने हात झटकले 
वाशी सेक्‍टर- १२ येथील वृक्षांसाठी राखीव भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. याबाबत उद्यान विभागाचे अधिकारी भालचंद्र गवळी यांनी सांगितले की, हा विषय अतिक्रमण विभागाचा आहे; तर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अंबरीश पटनीगिरी यांच्याबरोबर संपर्क झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com