आज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

तुमच्या मागण्यांबाबत आम्ही बेस्टला वेळापत्रक करून देऊ. आज रात्रीपर्यंत संप मागे घेण्याबाबत तुम्ही निर्णय घ्या. उद्या सकाळी आम्हाला त्याबाबत माहिती द्या.

- मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की बेस्टच्या संपाबाबत आज रात्रीपर्यंत निर्णय घ्या आणि या निर्णयाची उद्या सकाळी न्यायालयाला माहिती द्या, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून कामगारांना वेतनवाढ देण्याची हमी देत अन्य सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी न्यायालयात तयारी दर्शवली. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने बेस्ट कामगारांना संप मागे घेण्याची सूचना केली. याबाबतचे आदेश बेस्ट कामगारांच्या संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहेत. न्यायालयाने सांगितले, की ''तुमच्या मागण्यांबाबत आम्ही बेस्टला वेळापत्रक करून देऊ. आज रात्रीपर्यंत संप मागे घेण्याबाबत तुम्ही निर्णय घ्या. उद्या सकाळी आम्हाला त्याबाबत माहिती द्या'.

Web Title: To End Strike till tonight Court orders to BEST