अखेर ज्याची भीती होती तेच झालं! गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोनाबाधीतांची संख्या वाढली; रुग्णांचे खासगी रुग्णालयालाच प्राधान्य

भाग्यश्री भुवड | Saturday, 5 September 2020

मुंबईत गणेशोत्सवानंतर खासगी रुग्णालयांत दाखल कोव्हिड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यादरम्यान लोकांना संसर्गाची अधिक लागण झाल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवानंतर खासगी रुग्णालयांत दाखल कोव्हिड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यादरम्यान लोकांना संसर्गाची अधिक लागण झाल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  गेल्या आठवडाभरापासून अनेक खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयूची गरज असलेल्या कोव्हिडच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे. पालिकेच्या 72 नर्सिंग होम्स कोव्हिड सेंटर्स परत करण्याच्या निर्णयामुळे लोक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास प्रवृत्त होत आहेत. 

ठाणेकर उकाड्याने हैराण, तापमानाचा पारा 38 अंशावर

सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की शहरातील 15 हजार 911 आयसोलेशन बेड्सपैकी 7,663 बेड्स उपलब्ध आहेत. यावरून असे सूचित होते की, रुग्णांसाठी जास्त प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता सार्वजनिक रुग्णालयांच्या तुलनेत बर्‍यापैकी कमी आहे. खासगी रुग्णालयांत 3 सप्टेंबरपर्यंत केवळ 59 आयसीयू बेड्स रिक्त होते, तर सार्वजनिक रुग्णालयातील 113 बेड कोव्हिड रुग्णांनी व्यापले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये 82 टक्के बेड्स कोव्हिड रुग्णांच्या ताब्यात आहेत, तर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये 70 टक्के कमी रुग्ण आहेत. 

वैद्यकीय भरतीबाबत तपशील दाखल करा; उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

कुर्ल्यात खासगी रुग्णालयाची मागणी
कुर्ल्यात खासगी रुग्णालयाची मागणी जोर धरत असुन, स्थानिक प्रभाग अधिकारी यांनी पालिकेला पत्र लिहून 65 खाटा असलेले नर्सिंग होम पुन्हा कोव्हिडच्या रुग्णांसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. जी-72 नर्सिंग होम नॉन कोव्हिड करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यात तीन कुर्ल्याच्या एल वॉर्डमधील होते.

 

ऑगस्ट महिन्यात आयसीयूसाठी दिवसाला दोन किंवा तीन रुग्ण प्रतीक्षा यादीत होते. मात्र, गेल्या काही दिवसांत ही यादी 10 ते 12 रुग्णांपर्यंत वाढली आहे. मी स्वतः रुग्णालयात दाखल असून, गणेशोत्सवापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- डॉ. गुंजन चंचलानी,
अतिदक्षता विभागप्रमुख, भाटिया रुग्णालय

 

गेल्या 10 दिवसांत कोव्हिड रुग्ण वाढले असून, झोपडपट्टी नसलेल्या परिसरातील रुग्णसंख्या जास्त आहे. हे लोक खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत. आमच्या रुग्णालयात दोन व्हीआयपी प्रभाग असुन, दोन्हीकडे प्रतीक्षा यादीतील रुग्णसंख्या जास्त आहे. पालिकेकडून रुग्णांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करून त्यांना जम्बो सुविधा केंद्रात जाण्याचा सल्ला देतो. पण, लोक जम्बो सुविधेत जाण्यास नकार देतात. के वेस्टमध्ये दररोज 90 ते 100 नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. 10 दिवसांपूर्वी हा आकडा 50 पर्यंत पोहचला आहे.
- डॉ. गुलनार खान,
वैद्यकीय अधिकारी, के. पश्चिम प्रभाग