"जीवावर उदार होऊन काम केल्याबद्दल सलाम!"; ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी शेअर केला चित्तथरारक व्हिडीओ

सुमित बागुल
Saturday, 17 October 2020

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ अत्यंत चित्तथरारक आहे

मुंबई : नुकतीच मुंबईसह मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजेच ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईमध्ये बत्तीगुल झालेली. मुंबई सारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात बत्तीगुल होणं महापालिकेला आणि राज्यालाही परवडण्यासारखं नाही. मुंबईची बत्तीगुल होण्यामागची कारण तासली जातायत. स्वतः ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामध्ये घातपाताचा काही संबंध आहे का याबाबत संशय व्यक्त केला होता. 

अशातच आज महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ अत्यंत चित्तथरारक आहे. यामध्ये महापारेषणचे कर्मचारी हार्नेस बांधून स्वतःच्या जीवावर उदार होऊन उंचावरील विजेच्या ताराच्या दुरुस्तीचं काम करताना पाहायला मिळतायत. या सर्व कर्मचाऱ्यांची मेहनत आणि त्यांच्या कामाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना सलाम करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

महत्त्वाची बातमी : पुराच्या पाण्याने जीवघेण्या लेप्टो संसर्गाचा धोका, कशी होते लागण आणि कशी घ्याल काळजी, जाणून घ्या

महत्त्वाची बातमी :  भाजपच्या आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंच्या सुपुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप; म्हणालेत, "काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे! ग्रेट!"

"मुंबईला अखंडीत वीज पुरवठा करणा-या चार मुख्य वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा ते तळेगाव या वीज वाहिनीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम आणि अतिखोल भागात वादळ आणि वाऱ्यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्याबद्दल सलाम !!" असं ऊर्जामंत्री नितीन राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत. 

energy minister nitin raut shared mind blowinh video of electric board workers doing duty in hilly area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: energy minister nitin raut shared mind blowinh video of electric board workers doing duty in hilly area