मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्याची पदे भरा; 969 पदे रिक्त

Mumbai
Mumbai

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत रिक्त असलेली 969 अभियंत्याची पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे. 

अभियंत्यांची 4 हजार 482 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 3 हजार 513 पदे कार्यरत असून 969 पदे अजूनही रिक्त असल्याची माहिती (आरटीआय) माहितीच्या अधिकाराद्वारे समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडे अभियंत्यांची किती पदे मंजूर आहेत, कार्यरत किती पदे आहेत तसेच रिक्त पदे किती, याची माहिती विचारली होती. त्यानुसार नगर अभियंता कार्यालयाने अनिल गलगली यांना 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2018 या तिमाही अहवालाची प्रत दिली आहे.

या अहवालानुसार कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप प्रमुख अभियंत्यांची एकूण 4 हजार 482 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 3 हजार 513 पदांवर अभियंते कार्यरत असून 969 पदे रिक्त असल्याचे नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com