पदवीचे खोटे प्रमाणपत्र दिल्याने अभियंता निलंबित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई - महापालिकेतील एका कार्यकारी अभियंत्याने बढती मिळवण्यासाठी पदवीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. आता त्याला सेवेतून काढून टाकण्याची शिफारस पालिका प्रशासनाने केली आहे. बुधवारी (ता. 18) स्थायी समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

संबंधित अभियंता गेल्या वर्षापासून महापालिकेच्या सेवेत आहे. एप्रिलपासून तो कार्यकारी अभियंता (स्थापत्य), परिमंडळ (पूर्व उपनगरे) या पदावर होता. त्याने उपप्रमुख अभियंता (स्थापत्य) या पदावर बढती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. सोबत बुंदेलखंड विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी मिळवल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, बुंदेलखंड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम नाही. अभियंत्याने तिथे प्रवेश घेऊन पदवी प्रमाणपत्र मिळवल्याची बनावट कागदपत्रे सादर केली होती. समितीच्या छाननीत ही कागदपत्रे खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला "कारणे दाखवा' नोटीस बजावून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. निलंबित करून खात्यांतर्गत चौकशीही करण्यात आली. आरोप सिद्ध झाल्याने त्याला सेवेतून काढून टाकण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

Web Title: engineer suspend by post degree bogus certificate