अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा 2 मेपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) यंदा 2 ते 13 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी "एमएचटी-सीईटी'ची परीक्षा देतात. राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे; तसेच "एमएमएस'ची परीक्षा 9 आणि 10 मार्चला, "एमसीए'ची परीक्षा 23 मार्चला आणि विधी शाखेची पाच वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा
21 एप्रिलला घेण्यात येणार आहे.
Web Title: Engineering Admission Exam after 2 may