नवी मुंबई महापालिकेत अभियंता दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात अभियंता दिन (१५ सप्टेंबर) साजरा करण्यात आला.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात अभियंता दिन (१५ सप्टेंबर) साजरा करण्यात आला.

नवी मुंबई : शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जातात. अभियंत्यांना एवढी मोठी जबाबदारी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवन चरित्रातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून लीलया पार पाडता येते, असा विश्वास महापालिकेचे शहर अभियंते सुरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. रविवारी (ता. १५) महापालिकेत अभियंता दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. 

महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ हे नियमित सेवासुविधा पूर्ततेप्रमाणेच नवी मुंबई शहराला वेगळेपण देण्यासाठी अत्यंत सकारात्मक आहेत. रस्ते निर्मिती व सुधारणेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, सुव्यवस्थित दळणवळण सुविधा, पार्किंग नियोजन, शहर सुशोभीकरण, मैदाने उद्याने विकास अशा विविध माध्यमांतून नागरिकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच त्यामधून शहराच्या नावलौकीकात भर पाडण्यासाठी ठोस काम करूया, असे मार्गदर्शन पाटील यांनी उपस्थित अभियंत्यांना केले. शहर विकासाची प्रमुख जबाबदारी अभियंत्यांवर असल्याने त्यांच्यावर दैनंदिन कामाचा ताण असतो. त्यामुळे नियोजनबद्ध काम करून तणावमुक्त जगण्याचा मंत्रही पाटील यांनी उपस्थितांना दिला. 

अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्ताने देशभरात ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या सर्व अभियंत्यांनी एकत्र येऊन सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करून अभियंता दिन साजरा केला. या प्रसंगी कार्यकारी अभियंते अनिल नेरपगार, संजय देसाई, शंकर पवार, अजय संख्ये, अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे, मनोहर सोनावणे, शुभांगी दोडे, गिरीश गुमास्ते तसेच उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com