ठाणे - वज्रेश्वरी येथील यात्रोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन

 दीपक हीरे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वज्रेश्वरी (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवीचा ३ दिवस चालणारा यात्रोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्याकरिता गणेशपुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शेखर डोंबे यांनी नुकतीच गावात एक बैठक घेऊन योग्य त्या सूचना संबंधिताना दिल्या व  यात्रोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीस पाणीपुरवठा, वीज महामंडळ, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, महसूल प्रशासन, वज्रेश्वरी देवस्थान, पत्रकार, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी गावातील मुख्य पालखी रस्त्यावरील वाहतुकीत बदल भाविकांना मुबालग पाणी आपत्कालीन प्रसंगी आरोग्य सेवा, रात्रीच्या वेळी विजेची उपलब्धता भाविकान करिता गाड्या  पार्किंगची सोय  व राहण्याची व्यवस्था आदी विषयांवर चर्चा करून उपाय योजना सुचविण्यात आल्या आहे .

श्री वज्रेश्वरी येथे वज्रेश्वरी योगिनी  देवीचा यात्रोत्सव शनिवार दिनांक १४/०४/२०१८ ते सोमवार दिनांक १६/०४/२०१८ या दरम्यान संपन्न होणार आहे. चैत्र कृ चतुर्दशी या दिवशी सकाळी ०९:३० श्रींची महापूजा पारंपारिक पद्धतीने होईल तसेच रविवार दैनांक १५ एप्रील (चैत्र आमावस्या) हा यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी रात्री ९ वाजता दीप पूजा होईल सोमवारी १६ एप्रिल रोजी वैशाख शुद्ध प्रतिपदा  यादिवशी रात्री १२ वाजता देवीची पालखी देवळातून प्रस्थान करेल व गावात मिरवणुकीने  मंगळवारी सकाळी देवळात पुन्हा येऊन विसावेल अशाप्रकारे यात्रेचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे होईल असे वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान मार्फत कळविण्यात आले असून  तमाम भाविकांनी या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आहवान देवस्थान मार्फत करण्यात आले आहे.

Web Title: enjoy celebration of wajareshwari in silence