ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसुरेकर यांचे निधन

Avinash masurekar death
Avinash masurekar deathsakal media

मुंबई : मराठी रंगभूमीबरोबरच (Marathi theatre) मराठी चित्रपट (Marathi Movie) आणि मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते अविनाश मसुरेकर (Avinash Masurekar Death) यांचे चेंबूर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी तसेच सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर चेंबूर-चरई येथील स्मशानभूमीत (Funeral in chembur cemetery) अंत्यसंस्कार करण्यात आले.  

Avinash masurekar death
मुंबई : NCB च्या धाडीत 13 कोटींचं ड्रग्ज जप्त; नायजेरियन नागरिकाला अटक

अविनाश मसुरेकर यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क, हॅण्डस अप, शततारका, बायको उडाली भुर्र, फुलाला सुगंध मातीचा अशा काही नाटकांबरोबरच सुशीला, कलावंतीण, सूनबाई ओटी भरून जा, ते आठ दिवस अशा काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. घरकुल, सर्कस प्रेमाची, ब्योमकेश बक्षी अशा काही टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

घरकुल ही त्यांची मालिकाखूप लोकप्रिय ठरली. अतिशय प्रेमळ स्वभावाचे आणि सगळ्यांना सहकार्य करणारे असे ते कलाकार होते. संसार या मराठी चित्रपटाची संवाद आणि पटकथा त्यांनी लिहिली होती. या चित्रपटासाठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून सन १९८१ मध्ये त्यांना पुरस्कारही मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com