esakal | पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आरे कारशेड जागेचा आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आरे कारशेड जागेचा आढावा

राज्याचे पर्यारवण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड जागेचा आज आढावा घेतला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी घेतला आरे कारशेड जागेचा आढावा

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 20 : राज्याचे पर्यारवण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे कारशेड जागेचा आज आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कारशेडचा आढावा घेताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी देखील होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच आरेमधील प्रस्तावित कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही आरेमध्ये भुमापमाचे काम सुरूच होते. याबाबत पर्यावरणवाद्यांनी तक्रार केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. 

महत्त्वाची बातमी : आता N95 मास्क मिळणार 19 ते 49 रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीन पदरी मास्क 4 रुपयांना
 

आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील भुमापनाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे मेट्रो भवन इमारतीचे काय करणार याची ही चर्चा यावेळी ठाकरे यांनी केली. याशिवाय मेट्रो 3 आणि मेट्रो 6 प्रकल्प कसा जोडता येईल याची माहिती देखील ठाकरे यांनी घेतली. 

मेट्रो 3 आणि मेट्रो 6 प्रकल्पाचे दोन्ही कारशेड हे कांजूरमार्गला एकाच जागेवर उभारण्यात येणार आहेत. शिवाय आरे पर्यंतचे जे मेट्रोचं काम झाले आहे. त्याचा ही वापर केला जाणार आहे. हे काम तसेच त्यासाठी केलेला खर्च वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच आरे परिसरातून जाणा-या मिठी नदीलगत बांधण्यात आलेल्या भिंतीचा आढावाही आदित्य ठाकरे यांनी घेतला.

( संपादन - सुमित बागुल )

environment minister aaditya thackeray did review of aarey car shed land