सीएसएमटी रेल्वे स्थानकापुढे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा; खासदार अरविंद सावंत यांची मागणी

प्रशांत कांबळे | Thursday, 3 December 2020

मुंबई रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव दिले असल्याने सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

मुंबई : मुंबई रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव दिले असल्याने सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का उभारण्यात येऊ नये अशी मागणी बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यासोबत पार पडलेल्या वेबिनार बैठकीत  खासदार अरविंद सावंत यांनी केली.

हेही वाचा - शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या उपस्थितीत मुंबई विभागातील खासदारांची ऑनलाईन बैठक पार पडली त्यामध्ये बैठकीत उपस्थित खासदारांनी आपआपल्या मतदार संघातील रेल्वेशी संबंधित विकासाच्या मुद्यांवर मागणी केली. दरम्यान लोकलने प्रवास करतांना गर्भवती महिलांना फार यातना सहन कराव्या लागतात,  त्यामुळे गर्भवती महिलांसाठी टॉयलेटची सुविधा असलेले राखीव डबे असावे, त्याशिवाय शिवडी रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूने एकमेकांशी जोडणारा पादचारी मार्ग उभारण्याची मागणी सुद्धा यावेळी अरविंद सावंत यांनी केली आहे.

Advertising
Advertising

हेही वाचा - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण! आजपासून विशेष न्यायालयाकडून नियमित सुनावणी 

यावेळी बैठकीमध्ये खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल मोरेश्वर पाटील, श्रीरंग आप्पा बारणे, राजेंद्र गावित, मनोज कोटक यांची उपस्थिती होती. तर मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आणि इतर विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Erect a statue of Shivaji Maharaj in front of CSMT railway station Demand of MP Arvind Sawant 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )