मुरबाड : विद्यार्थ्यांनी श्रमदानातुन केली ग्रामस्थांची नदीपलीकडे जाण्याची सोय

मुरलीधर दळवी 
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुरबाड(ठाणे) : मुरबाड तालुक्यातील टोकावडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रम संस्कार शिबिरात माणगाव येथील डोईफोडी नदीवर दगडाचा बांध बांधून ग्रामस्थांची नदी पलीकडे जाण्याची सोय केली तसेच इंदे, माणगाव, पिंपळेश्वर मठ परिसराची साफ सफाई, ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करणेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती याविषयावर पथनाट्ये सादर केली 7 दिवसाच्या श्रम संस्कार शिबिरात त्यांनी ग्रामस्थांना आपलेसे करून घेतले.

मुरबाड(ठाणे) : मुरबाड तालुक्यातील टोकावडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रम संस्कार शिबिरात माणगाव येथील डोईफोडी नदीवर दगडाचा बांध बांधून ग्रामस्थांची नदी पलीकडे जाण्याची सोय केली तसेच इंदे, माणगाव, पिंपळेश्वर मठ परिसराची साफ सफाई, ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करणेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती याविषयावर पथनाट्ये सादर केली 7 दिवसाच्या श्रम संस्कार शिबिरात त्यांनी ग्रामस्थांना आपलेसे करून घेतले.

मुरबाड तालुक्यातील टोकावडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रम संस्कार शिबिरात डोईफोडी नदीवर दगडाचा बांध बांधून माणगाव येथील गावकऱ्यांना नदी पलीकडील पिंपळेश्वर मठावर जाण्यासाठी पायी रस्ता तयार करून दिला या मठावर हरिपाठ करण्यासाठी ग्रामस्थ जातात त्यांना तीन फूट पाण्यातून जावे लागत होते त्यांची आता चांगली सोय झाली आहे.

टोकावडे येथील जयवंतराव पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे श्रम संस्कार शिबिर 5 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान माणगाव(बंगालपाडा) येथे पार पडले. शिबिराचे उदघाटन जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक मधुकर मोहपे यांचे हस्ते झाले तर समारोप मंडळाचे सहसचिव भास्कर हरड यांचे हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मुरलीधर दळवी, अशोक पठारे, शिवळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक अरविंद घुडे यांनी केले सूत्रसंचालन मीनाक्षी राऊत या विद्यार्थिनीने केले.

या शिबिरात माणगाव, पिंपळेश्वर मठ, इंदे परिसरात ग्रामस्वच्छता तसेच सर्वेक्षण करण्यात आले अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती यावर पथनाट्ये सादर करून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली प्रा.धनेश हरड व प्रा.जितेंद्र तळेले यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले ग्रामस्थ तानाजी पष्टे, बुधाजी बंगाल यांनी विद्यार्थ्यांनी गावासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कैलास घरत व भाग्यश्री घोलप यांची निवड करण्यात आली. या शिबिरात आम्ही शिस्त, श्रमाचे महत्व व ग्रामस्थांशी कसे वागावे याचे शिक्षण घेतले व ग्रामस्थांचे प्रेम अनुभवले असे विद्यार्थ्यांनी सांगितले. घरामध्ये जेवल्यानंतर स्वतःचे ताट उचलायची, झाडू मारण्याची सवय शिबिरामुळे लागली आहे. या सात दिवसातील सामूहिक जबाबदारीचे शिक्षण आम्ही कधीच विसरणार नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले.   

मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक बी एस बिडवे शिबिरास भेट देण्यासाठी माणगाव येथे आले होते. या शिबिरात कुसुम विठ्ठल विशे या विद्यार्थिनीची त्यांनी दिल्ली येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या युथ फेस्टिव्हल साठी निवड केली. 750 महाविद्यालयातून निवडलेल्या 24 विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे.

Web Title: esakal marathi news murbad news student help nss camp

टॅग्स