ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम

signature campaign
signature campaign

मुंबादेवी: ब्रिटिशकालीन हँकॉक पुल पाडल्यानंतर दोन वर्षानंतरही नवीन पादचारी पुल न बांधला गेल्यामुळे स्थानिकांनी डोंगरी नुरबाग येथील चौकात मागील दोन वर्षांपासून या संदर्भात पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांच्यासह पूलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम सुरु केलेली आहे. डोंगरी, माझगावला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन हँकॉक पुलाला पाडून दोन वर्षे उलटली आहेत. त्याजागी पर्यायी पादचारी पुल उभारण्यास चालढकल करणाऱ्या रेल्वे आणि मुंबई महापालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाने शुक्रवारी चांगलेच सुनावले होते. हा सर्व समान्यांसाठी असलेला पूल आहे. हा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर पगार कसला घेता? अशा तिखट शब्दांत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या खंडपिठाने पालिका व रेल्वे प्रशासन यंत्राणांची चांगलीच कानउघाड़णी केली होती.

मागील दोन वर्षात पूल नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या काही निष्पाप विद्यार्थ्यांचा आणि प्रवाशांचा रेल्वे अपघातात हकनाक बळी गेला आहे. त्या संदर्भात रेल्वे प्रशासन आणि पालिकेविरुद्ध स्थानिकांनी विविध मार्गानी जनआंदोलन केले होते.पादचारी पूल नसल्याने जवळपास 7 कि.मी.चा वळसा घालून सैंड्हर्स्ट रोड ते माझगाव,भायखळा असा द्राविडी प्राणायाम करीत लोकांना जावे लागत आहे. यात वेळ आणि पैसा निष्कारण वाया जातो आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर अवघ्या 4 दिवसात म्हणजेच बुधवार 22 नोव्हेंबर 2017 ला मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे प्रशासनास तोडगा काढण्यास बजावले असून याचिकेची सुनावणी तहकूब केलेली आहे.

याच पार्श्वभूमिवर स्थानिकांनी जनजागृती व्हावी म्हणून डोंगरी नुरबाग येथील चौकात मागील दोन वर्षांपासून या संदर्भात पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांच्यासह चारुदत्त भाटकर, जेजे रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचारी अध्यक्ष कृष्णा रेणोसे, समीर शिरवडकर, पराग मांजरेकर, मयूर साळवी, अमित मालवणकर आदी कार्यकर्त्यांनी पूलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम सुरु केलेली आहे. जवळपास 2 हजार लोकांनी सहया करुन ब्रिज लवकरात लवकर व्हावा अशी मागणी केलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com