वज्रेश्वरीमध्ये होणार प्लास्टिक रस्ता

दीपक हीरे
रविवार, 28 जानेवारी 2018

वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी या पर्यटन व तिर्थक्षेत्र मधील मुख्य बायपास रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्लास्टिक अस्तर असलेला रस्ता तयार करण्यात येणार असून या रस्त्यासाठी खासदार कपिल पाटील व येथील उपसरपंच अविनाश राऊत यांनी या रस्त्याच्या मंजुरीसाठी सतत पाठपुरावा केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील जागृत देवस्थान व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व गरम पाण्याच्या कुंडामुळे महाराट्रासह देशभरात ख्याती असलेल्या वज्रेश्वरी या गावी वज्रेश्वरी योगिनी देवीचे मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी सुटीच्या दिवशी व मुख्य सण उत्सवच्या वेळी भविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते मात्र येथील अंबाड़ी ते सिरसाड या मुख्य रस्त्यावर वज्रेश्वरी या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असल्याने येथील रस्त्याची वर्षोँवर्ष बिकट अवस्था होते. त्यातच वाहतूक कोंडी मुळे येथील भविकांची ग़ैरसोय होत होती. वज्रेश्वरी ग्रामपंचायतचे उपसरपंच व वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानचे अध्यक्ष अविनाश राउत यानी यावर कायमचा उपाय योजना व्हावी यासाठी खासदार कपील पाटील यांच्या कड़े सतत येथील मुख्य समस्या मंडून त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे खासदार कपिल पाटील यानी त्याची दखल घेउन वज्रेश्वरी येथून बाहेरील बायपास रास्ता मुख्यमंत्री सड़क योजना अंतर्गत मंजूर करुन रस्त्याच्या दर्जा सुधारण्यासाठी प्लास्टिक अस्तर असलेला रस्ता तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारे टाकाऊ प्लास्टिक पासून तयार होणारा हा जिल्ह्यातील तिसरा आणि भिवंडी तालुक्यातील दूसरा रस्ता होणार आहे. यापूर्वी मुरबाड या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयोग करण्याचे निश्चित झाले आहे. 

Web Title: esakal marathi news vajreshwari news