नागरी समस्यांवर पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष्य वेधणार - आमदार गणपत गायकवाड

रविंद्र खरात 
शुक्रवार, 21 जुलै 2017

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात कल्याण डोंबिवली महानगर पालिका , उल्हासनगर महानगर पालिका आणि अंबरनाथ तालुक्यातील काही भागाचा समावेश होतो, पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, कचरा उचलणे गरजेचे होते मात्र ते न केल्याने पावसाळ्यात त्या कामांची पोलखोल झाली असून जागोजागी खड्याचे जाळे निर्माण झाले आहे. 

कल्याण- पावसाळ्यापूर्वी कल्याण पूर्व सहित कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत पालिकेने केलेल्या कामांची पाऊस सुरु होताच पोलखोल होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष्य वेधणार असल्याची माहिती कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड़ यांनी 'सकाळ' ला दिली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात कल्याण डोंबिवली महानगर पालिका , उल्हासनगर महानगर पालिका आणि अंबरनाथ तालुक्यातील काही भागाचा समावेश होतो, पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, कचरा उचलणे गरजेचे होते मात्र ते न केल्याने पावसाळ्यात त्या कामांची पोलखोल झाली असून जागोजागी खड्याचे जाळे निर्माण झाले आहे. त्यासोबत कचरा वेळेवर उचलत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे . दरम्यान रस्त्यात खड्डे पडले आहे त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे, कल्याण सहित राज्यात स्वाईन फ्लू च्या रुग्णाची संख्या वाढत असून कुत्रा चावल्यावर जो उपचार केला जातो तो औषधसाठा तुटवडा निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

नेवाळी येथील शेतकरी बांधवाच्या जमीन परत करा, गुन्हेगारीला आळा घाला, नाले सफाई घोटाळा, स्कायवाक़ वरील फेरीवाला अतिक्रमण, रस्ता रुंदीकरण बाधित नागरिकांचे पूर्नवर्सन, विद्युत बिल जास्त येतात, पाणी टँचाई, आरोग्याचा प्रश्न, डॉक्टर भर्ती, आरक्षित भूखंड अतिक्रमण, कल्याण पूर्व मध्ये परिवहन सेवा सुरु करा, कचरा न उचलणे, महानगर पालिकेच्या शाळेमध्ये गणवेश साठी पालक वर्गाची अड़वणुक, 27 गावातील अनधिकृत बांधकाम, कल्याण पूर्व मध्ये 30 वर्षापेक्षा जास्त काळ राहून ही पालिकेच्या बेकायदा बांधकाम बाबत नोटिसा, 27 गावात पाणी टँचाई, आदी नागरी प्रश्नावर तारांकित प्रश्नांद्वारे राज्य सरकार चे लक्ष्य वेधणार असल्याची माहिती यावेळी आमदार गणपत गायकवाड़ यानी दिली. यामुळे पावसाळी अधिवेशन कल्याण पूर्व सहित पालिका हद्द मधील नागरी प्रश्नावर गाजण्याचे चिन्ह आहे. 

Web Title: esakal news sakal news kalyan news