कल्याण- सीसीटीव्हीच्या वायरच्या सहाय्याने आधारवाडी जेलमधून 2 कैदी पळाले

सुचिता करमरकर
रविवार, 23 जुलै 2017

सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. जेलमधील सीसीटीव्हीच्या वायरच्या सहाय्याने जेलची संरक्षक भिंत पार करुन ते पळाले. खडकपाडा पोलिस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. हे दोनही आरोपी चोरी तसेच दरोड्याच्या प्रकरणात अटक झाले होते.

कल्याण- कल्याणच्या आधारवाडी जेलमधून आज सकाळी दोन कैदी पळून जाण्यात यशस्वी ठरले. मणीटंडन नाडर आणि डेव्हीड देवेंद्रन अशी या दोघांची नावे असून ते दरोड्याच्या गुन्ह्यात अटक होते. 

 सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. जेलमधील सीसीटीव्हीच्या वायरच्या सहाय्याने जेलची संरक्षक भिंत पार करुन ते पळाले. खडकपाडा पोलिस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. हे दोनही आरोपी चोरी तसेच दरोड्याच्या प्रकरणात अटक झाले होते. या घटनेमुळे जेलमधील सुरक्षा व्यवस्था तसेच तेथील एकुण कार्यपध्दती पुन्हा एकवार चर्चेचा विषय झाली आहे. मागील सहा महिन्यात जेलमधे मोबाईल मिळाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. 

मुंबईतील मंजुळा शेटे हत्येनंतर कारागृहातील सुरक्षांबद्दल अनेक उणीवा समोर आल्या आहेत. कल्याण मधील या घटनेने त्या अधिक स्पष्ट झाल्या आहेत. आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जिकीरीचे झाले आहे. त्यातच पाठोपाठ घडत असलेल्या घटनांमुळे कल्याण कारागृहातील सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. जेलमधील अंतर्गत हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेराच्या वायरच्या सहाय्यानेच या दोन कैद्यांनी पलायन केले. 

Web Title: esakal news sakal news kalyan news