कल्याण- रेल्वे स्थानकावरील शेड मधून पाण्याची गळती ; प्रवासी संघटनेची दुरुस्तीची मागणी 

रविंद्र खरात 
शनिवार, 22 जुलै 2017

कल्याण- मुसळधार पावसामुळे कल्याण,ठाकुर्ली, शहाड ,आंबिवली ,टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्मवरील शेड गळती होत असून धबधब्यासदृश्य स्थिती आहे. या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करा अशी मागणी कल्याण, कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने रेल्वे प्रशासनाकड़े केली आहे.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकात नव्याने पादचारी पुलाचे काम केले मात्र प्लॅटफार्म वरील अर्धवट पत्र्याच्या शेड मुळे प्रवासी वर्गाला मुसळधार पावसात भिजत लोकल पकडावी लागते. कल्याण रेल्वे स्थानकातही शेड मधून पावसाचे पाणी गळत असून उल्हासनगर रेल्वे स्थानकातही जणू एक धबधबा निर्माण झाला आहे अशीच परिस्थिती कल्याण पुढील रेल्वे स्थानक शहाड, आंबिवली, टिटवाळा, बदलापुर, अंबरनाथ रेल्वे स्थानकात निर्माण झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. दररोज लाखो प्रवासी कसारा, कर्जत आणि कल्याण, मुंबईच्या दिशेने लोकल ने प्रवास करतात, पाऊस आल्यानंतर प्रवासी शेडचा आडोसा घेउन उभे राहतात. मात्र अनेक ठिकाणी ते शेड गळके आणि अर्धवट असल्याने त्यातून पडलेल्या पावसाच्या पाण्यात ओलचिंब होवून लोकल पकडावी लागते. या रेल्वे स्थानकात त्वरित काम करून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी रेल्वे प्रशासन कड़े केली आहे . 

दरम्यान याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आगामी आठवड्यात युध्दपातळीवर हे दुरुस्तीचे काम केले जाईल.

Web Title: esakal news sakal news kalyan news railway station news