कल्याण-डोंबिवली मध्ये पावसादरम्यान 10 झाड़े कोसळली ; एक कार आणि 7-8 मोटारसायकलींचे नुकसान

रविंद्र खरात 
शुक्रवार, 21 जुलै 2017

आज सकाळ पासून जोरदार वाऱ्यासहित पावसाने 10 ठिकाणी झाड़ कोसळल्याच्या तक्रारी येताच सर्व ठिकाणी पथक पाठवून झाड़े बाजूला घेण्याचे काम सुरु आहे , कल्याण पश्चिम मधील संघवी इस्टेट परिसर मध्ये एक झाड़ पडल्याने एक कार आणि 7 ते 8 मोटारसायकलचे नुकसान झाल्याची माहिती अग्निश्यामन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली 

कल्याण- कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात मागील आठ दिवसापासून पाऊस पड़त असून आज शुक्रवार पहाटे पासून जोरदार वाऱ्यासहित पावसाने हजेरी लावली. पावसादरम्यान 10 ठिकाणी झाड़े कोसळली तर एका ठिकाणी एक कार आणि 7 -8 मोटारसायकलचे नुकसान झाले आहे . 

कल्याण डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात मागील 24 तासात 68 मि.मि. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 1 जून 2017 पासून आज(शुक्रवार) सकाळी 7 वाजेपर्यंत 1699 मि.मि. पाऊस पडला आहे. मागील आठ दिवस पडलेल्या पावसाने शहारतील रस्ते खड्डेमय झाले असून ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे . दरम्यान आज (ता. 21 जुलै) रोजी पहाटे पासून जोरदार वाऱ्या सहित पावसाने हजेरी लावली , यात पालिका क्षेत्रात 10 झाड़े कोसळली, कल्याण पश्चिम संघवी इस्टेट परिसरात झाड कोसळल्याने एक कार आणि 7-8 मोटारसायकलचे नुकसान झाले, अशी माहिती ब प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलवण्यात आले आणि ते झाड़ बाजूला करण्यात आले. गौरी पाड़ा परिसर येथे सुद्धा झाड़ कोसळल्याने काही काळ त्या परिसरातील वाहतुक ठप्प झाली होती .

 

 

 

Web Title: esakal news sakal news mumbai news kalyan dombiwali news