रेल्वेस्थानकानंतर आता मेलगाड्यांमध्येही निकृष्ट दर्जाची अन्न विक्री

रविंद्र खरात
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मेल गाड़ी अथवा रेल्वे स्थानक मध्ये रेल्वे प्रशासन ने अटी शर्ति दिल्या आहेत त्यानुसार संबधित ठेकेदाराने अन्न पदार्थ विक्री करायची आहे , चेन्नई एक्सप्रेस मधील घटना बाबत प्रवासी वर्गाने तक्रार करणे अपेक्षित असून ती केली असल्यास त्या मेलगाड़ी मधील ठेकेदाराची चौकशी करून कारवाई केली जाईल.  
- ए. के, सिंग (मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी) 

कल्याण - मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकामध्ये खासगी ठेकेदारांमार्फ़त निकृष्ट दर्जाचे अन्न विक्री होत असून आता लांबपल्याच्या मेल गाड़ीमध्येही निकृष्ट दर्जाचे अन्न विक्री होत असल्याचे उघड़ झाले आहे. त्या अन्न पदार्थाचे अव्वाच्या सव्वा पैसे घेवून प्रवासी वर्गाची लूटमार सुरु असल्याचे उघड़ झाले आहे.

मध्य रेल्वेच्या कसारा ,खर्डी ,आटगांव व वासिंद येथे  मागील 10 वर्षापासून उपहारगृह बंद असून ते सुरु करावे यासाठी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाच्या वतीने अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येतोय मात्र रेल्वे प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. ज्या स्थानकात उपहारगृह सुरू आहेत ते रेल्वेने ठरवून दिलेल्या खाद्यपदार्थाच्या यादीप्रमाणे पदार्थ ठेवत नाहीत शिवाय विक्रीचे दर आकारणी न करता अवाजवी दर लावून विकतात याबाबत अनेक वेळा तक्रारी करून दखल घेत नसल्याचा आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे .

अनेक रेल्वे स्थानकातील छोट्या हॉटेलमधून 'रेल नीर' ही पाण्याची बाटली विक्री करणे बंधनकारक असताना तेथून लोकल बाटल्या विकून नफा कमावितात तर खाद्यपदार्थ विकताना स्वच्छतेची काळजी घेत नाहीत .प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे दुषित पाणी खाद्य पदार्थ  वडा ,समोसा व इतर पदार्थ  बनविताना वापरतात असे प्रकार कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनाने उघड़कीस आणून ही रेल्वे प्रशासन कारवाई करत नसल्याचा संताप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे . 

मेल गाड्या मधून ही लूटमार ....
मेल गाड्यांमधून प्रवासी वर्गाकडून खुले आम लूटमार करत असल्याचे उघड़ झाले आहे. कल्याण पूर्व मधील भाजपा पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के आणि त्यांचे सहकारी तिरुपती बालाजीला देवदर्शनाला गेले होते त्यांनी तेथून मुंबई कडे येण्यासाठी शुक्रवार ता 29 रोजी चेन्नई एक्सप्रेस ने प्रवास सुरु केला. बी-1 एसी कोच मधून प्रवास सुरु केला, त्यावेळी त्यांना चांगलाच अनुभव आला, अधुन मधून काही जण अन्न पदार्थ विक्रीसाठी घेवून येत होते, काही जण त्यांच्याशी वाद घालत होते, मात्र प्रवासात किरकिर नको म्हणून काही प्रवासी गप्प बसत होते यावेळी परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के आणि त्यांच्या मित्रांनी संबधित वेटर कडून मेनूकार्ड मागितले तेव्हा त्यांनी बनावट मेनू कार्ड दिल्याने संशय आला मग त्यांनी चहा मागितला 7 रूपयांचा चहा 10 रुपयास दिला, ऑमलेट ब्रेड 35 रूपयाला दिले पाहिजे ते 50 रूपयाला देत होते, वेटरच्या गळ्यात ओळखपत्र नव्हते, पदार्थ निकृष्ट दर्जाचे होते. ही लूटमार लक्षात येताच तेथील टीसीला सांगितले मात्र त्याने दखल न घेतल्याने अखेर पुणे रेल्वे स्थानक मधील स्टेशन मास्तर, रेल्वे मंत्रालय, मंत्री यांना सोशल मीडियावर तक्रार तर रेल्वेच्या अन्न व औषध विभागाला मेलवर तक्रार केली आहे अशी माहिती केडीएमटी परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी दिली. मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने तक्रार केली आणि संबधित ठेकेदारावर कारवाई होई पर्यंत पाठपुरावा करेल मात्र सर्व सामान्य प्रवासी वर्गाचे क़ाय ? असा सवाल यावेळी त्यांनी केला . 

Web Title: eskal news central railway poor quality food in train