ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बिघाडामुळे केंद्रांवर खोळंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

ऐरोली मतदारसंघातील ऐरोली व कोपरखैरणेमध्ये घडला. तसेच बेलापूर मतदारसंघातील नेरुळ त्याचप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेल, कामोठे, तळोजा, खारघर या भागात तर उरणमधील मोरा भागात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाले होते.

नवी मुंबई : राज्य विधानसभेसाठी सोमवारी (ता. २१) झालेल्या निवडणुकीत ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण या चारही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. मात्र; या चारही विधानसभा मतदारसंघांतील काही बुथमधील ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन बिघडण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही वेळ मतदानात खोळंबा होण्याचे प्रकार घडले. 

मात्र, मतदान केंद्र प्रमुखांनी तत्काळ नादुरुस्त ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली. हा नादुरुस्तीचा प्रकार ऐरोली मतदारसंघातील ऐरोली व कोपरखैरणेमध्ये घडला. तसेच बेलापूर मतदारसंघातील नेरुळ त्याचप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पनवेल, कामोठे, तळोजा, खारघर या भागात तर उरणमधील मोरा भागात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाले होते. त्यामुळे काही काळ या मतदान केंद्रात खोळंबा झाला होता. मात्र, केंद्रप्रमुखांनी तत्काळ नादुरुस्त ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या चारही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडल्याचेही पोलिसांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Evacuation of centers due to EVM, VVPAT deterioration