थंडीच्या महिन्यातही स्वेटर विक्रेत्यांचा व्यवसाय थंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अवेळी पडणारा पाऊस, सततचे बदलते वातावरणामुळे यंदा थंडीचे महिणे सुरु झाले तरी अजून थंडीची चाहूल लागलेली नाही. 

प्रभादेवी : अवेळी पडणारा पाऊस, सततचे बदलते वातावरणामुळे यंदा थंडीचे महिणे सुरु झाले तरी अजून थंडीची चाहूल लागलेली नाही. ज्यामुळे स्वेटर, चादरी आणि उबदार जॅकेट खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईकच नसल्याने थंडीच्या महिन्यातही स्वेटर विक्रेत्यांचा व्यवसाय थंडच सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

स्वेटर, उबदार चादरी, ब्लॅंकेट्‌स मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या परेलच्या मार्केटमध्ये बरेच ग्राहक दूरहून खरेदीसाठी येत असतात, यंदा पावसामुळे म्हणावे त्या प्रमाणात ग्राहक आले नसल्याने विक्री कमी प्रमाणात होत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी दिली. साधारण सप्टेंबर महिन्याअखेरीस पाऊस ओसरला कि दिवाळी पासून गुलाबी थंडी पडण्यास सुरुवात होते त्यामुळे दिवाळीपासून अनेक विक्रेते आपला माल विकण्यास सुरुवात करतात. 

मात्र यंदा नोव्हेंबर महिना उजाडला असला तरी अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे दिवाळी संपली तरीदेखील स्वेटर, उबदार जॅकेट, चादरी, ब्लॅंकेट घेण्याची लगबग अद्याप सुरु झालेली नाही. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपेक्षेप्रमाणे जरी धंदा झाला नसला तरी अजूनही थंडीचे तीन महीने बाकी आहेत या तीन महिन्यात आम्ही जास्त विक्री करू असा विश्वास परेल येथील स्वेटर विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. 

web title : Even during the colder months, sweater vendor business flops


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even during the colder months, sweater vendor business flops