स्नेहभोजन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

राज्याच्या काही जिल्ह्यांत पूरस्थिती व त्यात झालेले मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत, तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम या वर्षी रद्द केला आहे.

मुंबई  - राज्याच्या काही जिल्ह्यांत पूरस्थिती व त्यात झालेले मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत, तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्यदिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम या वर्षी रद्द केला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच स्वातंत्र्यदिनी सायंकाळी मुंबई शहरातील मान्यवरांसोबत स्नेहोपहार (चहापान) या दोन कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्र्यांकडून दरवर्षी केले जाते. मात्र नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी उद्या (ता. 14) आयोजित स्नेहभोजन आणि ता. 15 रोजी सायंकाळी स्नेहोपहार कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. फडणवीस यांनी सर्व निमंत्रितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असून, नैसर्गिक आपत्तीमुळे उद्‌भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांच्या बहुमोल पाठिंब्याची व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Event Cancel by Devendra fadnavis for Flood Affected